जालना: जालना मर्चंट बँक घोटाळा : एमपीआयडी अंतर्गत कलमांची वाढ; भोकरदन शाखा व्यवस्थापक अटकेत; सहा दिवसांची पोलीस कोठडी
Jalna, Jalna | May 7, 2026 जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत भोकरदन शाखेच्या व्यवस्थापकाला अटक केली असून न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवार दि. 7 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध जोपासणारा कायदा (एमपीआयडी) अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. जालना शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केली.