जालना: शहरातील पोलीस कॉटर परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी मणियार जातीच्या सापाला पकडून सर्पमित्राने दिले जीवनदान
Jalna, Jalna | Jun 25, 2026 आज दि.25 जून 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पोलीस कॉटर परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी काल दि.24जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास विषारी मणियार जातीचा साप आढळून आला,या पोलीस कर्मचाऱ्याने तात्काळ याची माहिती सर्पमित्र रामेश्वर शहा यांना फोन कॉलवर दिली,रामेश्वर शहा यांनी या सापाला पकडून फॉरेस्ट मध्ये सोडले आहे,पावसाळ्याचे दिवस आहे नागरिकांनी खबरदारी घ्यावी साप आढळून आल्यास त्याला मारू नये सर्पमित्रांशी संपर्क साधावा.