पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये शिकणाऱ्या मुलींना UPT (प्रेग्नन्सी) टेस्ट करण्यास भाग पाडण्याच्या अत्यंत लाजिरवाण्या आणि गंभीर प्रकारावर राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी सभागृहात हा मुद्दा उपस्थित झाल्यावर कठोर कारवाईचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असतानाही, पुन्हा असे प्रकार घडणे हे चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार नाना पाटोले यांनी दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला.