चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, गोळीबार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींसह त्यांना शस्त्र पुरवठा करणाऱ्या अशा एकूण चार जणांना मंगळवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपींकडून ३ गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.