पाचोरा: शिवाजीनगर भागातील गटारीवरील अनधिकृत बांधकामे जेसीबी द्वारे नगरपालिकेतर्फे तोडण्यात आली,
पाचोरा शहरातील शिवाजीनगर भागातील गटारीन वरती अनधिकृत कामे करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह अडविला गेला होता यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी अडवले गेले व व अतिवृष्टीमुळे बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरले, याची तात्काळ दखल पाचोरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी घेत पाचोरा नगर परिषद अतिक्रमण विभागातर्फे पाचोरा शहरात आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून शिवाजीनगर बस स्टॅन्ड रोड येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या गटारीवरील अनधिकृत बांधकामे जेसिबी द्वारे तोडण्यात आली,