माजलगाव: धनंजय मुंडे यांनी नाव घेऊन बोलावे, माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे धनंजय मुंडे यांना उत्तर
धनंजय मुंडे जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांमुळे बदनामी झाली असंम्हणतात. तर ते बीडचे चार-पाच पुढारी कोण? याबाबत धनंजय मुंडे यांनी नाव घेऊन बोलायला पाहिजे. ते जर संतोष देशमुख प्रकरणाबाबत बोलत असतील तर ते विधानसभेत जाहीरपणाने मांडणं म्हणजे बदनामी नाही. हे हत्याकांड कुणी घडून आणलं, त्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळायला पाहिजे, ही आमची मागणी होती. आरोपी पकडले गेलेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीसाठी केली गेली. खंडणी मागणीची ताकद कोणाची होती?