समुद्रपूर: विद्यार्थिनी म्हणाल्या: आम्हीही पोषण वाटिका उभारू,
गिरड येथील कन्या शाळेचा देशी बीज दान अभियानात उत्फुर्त सहभाग
गिरड'आम्ही शाळेत मागील वर्षी पोषण वाटिका निर्माण केली होती .पोषण वाटीकेतून भाजीपाला फळ पिकवली ; मध्यांग आहारात वापरली यासाठी मगन संग्रहालयाच्या बीज दान अभियानाचे योगदान मिळाले. यावर्षीही आम्ही शाळेत आणि स्वताच्या घरी पोषण वाटिका निर्माण करू असा संकल्प उच्च प्राथमिक कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनींनी केला. मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्राच्या वतीने बीज दान अभियानातर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थीनींनी बीज पात्रात बीज दान करून सहभाग नोंदविला.