सेनगाव: पोलिसांची आठवडी बाजार परिसरात धडक कारवाई; १५ ट्रॅफिक केसेस, एका संशयिताकडून खंजीर जप्त
सेनगांव शहरातील आठवडी बाजार परिसरात आज पोलिसांनी धडक कारवाई करून 15 ट्राफिक केसेस करून एका संशयताकडून खंजीर जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्रे यांच्या आदेशानुसार सेनगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व पथकाने आठवडी बाजार परिसरात आज पेट्रोलिंग मोहीम राबवली या दरम्यान पोलिसांनी 15 ट्राफिक नियम भंगाच्या केसेस नोंदवून संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली. तसेच या मोहिमेदरम्यान एका संशयितास ताब्यात घेण्यात आले.