तेल्हारा: राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी उद्या अकोला जिल्ह्याचा दौरा
Telhara, Akola | Sep 27, 2025 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आज अकोला जिल्ह्याचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रशासनासोबत चर्चा केली. तसेच शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे का याचा आढावा घेतला. अहिर यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाशी संबंधित मागण्याही ऐकून घेतल्या. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. अहिर यांनी सर्व मागासवर्गीयांना न्याय मिळावा यासाठी आयोग व सरकार कटिबद्ध आहेत.