एक जानेवारीला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंशुल गावंडे व राहुल धुर्वे हे डबल सीट दुचाकी ने पोलीस स्टेशन गणेश पेठ हद्दीतील गीतांजली चौक येथून दुचाकीने जात असताना दुचाकी चालकाने भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याने अंशुल दुचाकी वरून खाली पडला व गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून गणेश पेठ पोलीस ठाण्यात तू चाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे