वर्धा: "कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना शाबासकी,तर कामचुकारांचा समाचार : आमदार बकाने यांचा अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान प्रसंग
Wardha, Wardha | Sep 15, 2025 देवळी-पुलगाव मतदारसंघातील अलीपुर, काणगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाने यांनी महसूल, कृषी, बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.दौऱ्यादरम्यान एका अधिकाऱ्याचे काम गावकऱ्यांनी विशेष कौतुक करताच, आमदार बकाने यांनी तत्काळ त्या अधिकाऱ्याचे अभिनंदन करून प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की, "गावकऱ्यांकडून अशीच पावती मिळेल, असेच काम करायला हवे."याच वेळी, एका विभागाचा अधिकारी दौऱ्याला अनुपस्थित