भद्रावती: हुतात्मा स्मारक येथे सकल ओबीसी समाजाची बैठक.
राज्य शासनाने मराठा आरक्षणच्या मुद्यावरुन स्वतंत्र अध्यादेश काढुन सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केल्या जात असल्याच्या विरोधात ओबीसी समाजातर्फे दिनांक १० आक्टोबरला नागपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात शहर तथा तालुक्यातील ओबीसी समाज सहभागी होणार आहे. त्यासिठी नियोजन करण्यासाठी शहरातील हुतात्मा स्मारक येथे ओबीसी समाज बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.