जालना: किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेमुळे स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल 15 दिवस विश्रांतीवर
Jalna, Jalna | Jun 10, 2026 जालना महानगरपालिकेचे स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती कपिल श्रावण भुरेवाल यांच्यावर किडनी स्टोनची दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना 15 दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या कालावधीत नियमित शासकीय कामकाज पाहणे शक्य होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. कपिल भुरेवाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिनांक 2 जून 2026 रोजी त्यांच्या उजव्या बाजूच्या किडनी स्टोनवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्रास कायम राहिल्याने पुढील तपास