मुदखेड: रोडवर कोळसा वाळत घातल्याच्या कारणावरून माळकौठा येथे दोघांनी एका तरूनास गंभीर मारहाण करून केला खुन;आरोपींना अटक तपास सुरू
Mudkhed, Nanded | Sep 21, 2025 नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मौजे माळकौठा येथे दि 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास यातील मयत संजय हिरामण पवार वय 23 वर्षे यास यातील आरोपी 1) अमोल हनुमंते 2) रितेश हनुमंते यांनी मयतास रोडवर कोळसा वाळत घातल्याच्या कारणावरून गंभीर दुखापत करून खुन केला.याप्रकरणी आज दुपारी गुन्ह्यातील आरोपीतास अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.