नागपूर शहर: बेपत्ता असलेल्या सहावीच्या विद्यार्थ्यांचा रहस्यमय मृत्यू, न्यू चनकापूर येथे झुडपात आढळला मृतदेह,
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका सहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह न्यू चनकापूर येथील झुडपांमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा विद्यार्थी अपहरणानंतर हत्येचा बळी ठरला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.जितू युवराज सोनेकर वय ११ वर्ष असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. १५ सप्टेंबरला सकाळी तो शाळेत जाण्यासाठी निघाला परंतु घरी परतलाच नाही.