जालना: कुत्रा भुंकण्याच्या कारणावरून तलवारीने हल्ला; दोघे गंभीर जखमी; जालना शहरातील क्रांतीनगर परिसरातील घटना
Jalna, Jalna | May 6, 2026 पाळीव कुत्रा भुंकत असल्याच्या किरकोळ कारणावरून तलवारी आणि लाकडी दांड्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना जालना शहरातील क्रांतीनगर परिसरात घडली. बुधवार दि. 6 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात दीपक भिकाजी ससाणे आणि त्यांचा भाऊ शंकर ससाणे गंभीर जखमी झाले असून महिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी दीपक भिकाजी ससाणे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानुसार, ते घरातून ड्युटीवर जाण्यासाठी बाहेर पडले होते.