मुरुड: मुरुड एकदरामध्ये घरावर दरड कोसळली
Murud, Raigad | Sep 16, 2025 मुरुड तालुक्यातील एकदरा गावात मंगळवारी (दि.16) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महेश साळुंखे व श्रीकेश साळुंखे यांच्या घराच्या मागील बाजूस दरड कोसळली असून, महेश यांच्या स्वयंपाक घराचे मोठे नुकसान झाले आहे.मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने महेश यांची पत्नी स्वयंपाक घरातील कामे उरकून हाॅलमध्ये गेल्यामुळे संभाव्य धोका टळला आहे.