विवाहिता सासरी असताना तिच्या माहेरी तलाकची नोटीस पाठविल्याने मुस्कान शेख (वय २६, रा. मास्टर कॉलनी) या विवाहितेने फिनायल प्राशन केले. हा प्रकार सोमवारी २२ डिसेंबर रोजी मास्टर कॉलनीमध्ये घडला. या प्रकरणी दुपारी ३ वाजता पती, सासू, सासरे, नणंदेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.