सेनगाव: तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात,भेटीगाठींवर भावी सदस्यांचा जोर
सेनगांव तालुक्यातील विविध पक्षाचे भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हे मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार असून त्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून विविध पक्षाचे व तसेच अपक्ष भावी सदस्य हे आपल्या जिल्हा परिषद गट व गणामध्ये नागरिकांच्या भेटीसाठी घेताना दिसून येत आहेत. तसेच आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास संबंधित भावी सदस्य हे नागरिकांना देताना दिसून येत आहेत.