राजूरा: आमदार देवराव भोंगळेच्या मध्यस्तीने रामपूर येथे बंद झाले टॉवर्सचे काम
राजुरा तालुक्यालगत असलेल्या रामपूर गावातील वॉर्ड क्र. 2 मध्ये मोबाईल टॉवर्स उभे करण्याचे काम खाजगी जागेवर सुरु केले होते. दाट वस्ती असलेल्या ठिकाणी टॉवर्स उभे केल्यास भविष्यात परिसरातील जनतेच्या आरोग्याची समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण होणार म्हणून आज दि 10 नोव्हेंबर ला 12 वाजता वॉर्डातील महिलांना याची माहिती मिळताच एकत्र येत आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे जाऊन टॉवर्सचे बांधकाम थांबविण्याची मागणी केली. महिलांच्या मागणीची दखल घेत काम बंद पाडले.