आज २८ डिसेंबर रविवार रोजी दुपारी साडे चार वाजता पानवेली बहुउद्देशीय संस्था, अमरावती यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बारी समाज उपवर युवक–युवती परिचय संमेलन उत्साहात पार पडले. आमदार रवि राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी समाजातील गोर-गरीब कुटुंबातील विवाहयोग्य वर–वधूंना मदत करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढून आर्थिक अडचणींमुळे अडलेल्या विवाहांना दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त