बुलढाणा: अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं,पण सरकार अजून झोपेत आहे -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
६९०० रुपयांत शेतकऱ्यांचं आयुष्य उभं राहणार आहे का? ही मदत नाही, हा शेतकऱ्यांचा केलेला अपमान आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या दु:खाची नाही, फक्त जाहिरातींची काळजी आहे. मंत्री फोटो काढत फिरतात, पण शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अजून आहे त्याचे काय करणार आहात?शेतकरी रडतोय, आणि सत्ताधारी फक्त भाषणं देत आहेत. फोटो आणि जाहिरात करत फिरत आहेत.असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.