अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करीत १२ लाख रुपये किमतीच्या वाहनासह १६ हजार रुपयांची वाळू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी अजिंठा चौफुली परिसरात करण्यात आली. या प्रकरणी दुपारी तीन वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.