नगर: आधार कार्ड अपडेटसाठी शहरांमध्ये प्रचंड गर्दी; सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शेळके यांचे आयुक्तांना निवेदन
शासनाने नुकताच एक शासननिर्णय काढून सर्व शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. या आदेशामुळे सध्या शहरातील आधार कार्ड सेंटरवर प्रचंड गर्दी उसळली असून, अनेक ठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. काही ठिकाणी तर गोंधळ, ढकलाढकली व भांडणांचीही वेळ येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत (काका) शेळके यांनी आयुक्तांना निवेदन दिले