ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज रविवार, दि. ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गावातील स्वच्छता अभियानांतर्गत डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबिन तर वस्तीवरील प्रत्येक कुटुंबाला एक डस्टबिन वाटप करण्यात आले.गावात स्वच्छता राखण्यासाठी दररोज घंटागाडी फिरविण्यात येत असून, या डस्टबिनच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वेगळा करण्यास नागरिकांना मदत होणार आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण झाल्यास स्वच्छतेची सवय अधिक बळकट होणार आहे.