बुलढाणा: अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत जिल्हा प्रशासन ताकतीने दिवाळीपूर्वी पोहोचवील - जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील
जून-जुलै-ऑगस्ट या तीन महिन्यात दोन लाख बारा हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 152 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत तात्काळ मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आधार कार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्र सेतू केंद्र किंवा नजीकच्या तहसील कार्यालयात सादर करावे.