पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळनष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दि. १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन स्तरावर जुगार व दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता २६ आरोपींच्या ताब्यातून दारू, दारू गाळण्याचे साहित्य व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत ३ लाख ८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.