भंडारा: भंडारा नगरपरिषदेतील भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी करण चव्हाण यांना नोटीस; जुम्मा प्यारेवाले यांची नियुक्ती
भंडारा नगरपरिषदेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यावर अखेर कारवाईची टांगती तलवार कोसळली आहे. त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्या जागी तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी काही दिवसांपूर्वीच भंडारा नगरपरिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप केला होता.