डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी शिरूर कासार येथील जिजामाता या मुख्य चौकात नागरिकांचे वतीने रास्ता रोको करत तीव्र निषेध करण्यात आला.सध्या राज्यभरात फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत समाजाच्या सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सदर प्रकरणात ही आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला