राजूरा: राजुरा येथील इन्फंटच्या विद्यार्थ्यांची राजुरा पंचायत समिती आणि मातोश्री वृद्धाश्रमाला भेट
इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील इयत्ता नववी व दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पंचायत समिती राजुरा आणि इयत्ता आठवी व नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाला आज दि. 18 सप्टेंबर ला 12 वाजता शैक्षणिक भेट दिली.पंचायत समिती राजुरा येथे विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतींची कामे, नगरपरिषदेचे कामे, आरोग्य विभाग, शेतीची माहिती, शाळा कशी चालते, विविध प्रकारच्या योजना तसेच अंगणवाडीची माहिती प्राप्त केली.