बाल विवाहासारखी सामाजिक कुप्रथा रोखण्यासाठी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्यावतीने बाल विवाह मुक्त वर्धा जिल्हा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांत नागरिकांनी सहभाग नोंदवून बाल विवाह विरोधी ऑनलाईन शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.