जालना: आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल; प्रभाग क्रमांक १० मध्ये साफसफाई
माजी नगरसेवक विजय पवार यांच्या पाठपुराव्याला यश
Jalna, Jalna | Jun 4, 2026 जालना शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील माळीपुरा, कसबा, देढकरवाडी, गांधी चमन, शिस्त टेकडी व कुंडलिका नदी परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक विजय पवार यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देत तातडीने साफसफाईची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने विजय पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यांच्या या भूमिकेनंतर महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेत शिस्त टेकडी,