फलटण: कर्मचारी वेतनासह अन्य मागण्यांसाठी फलटण येथे एस. टी. कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन, विद्यार्थी, प्रवाशांचा खोळंबा
राज्य शासन कर्मचार्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) कर्मचार्यांना वेतन द्यावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी फलटण आगारातील एस. टी. चालक, वाहक कर्मचार्यांनी बुधवार दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरु केले. कर्मचारी काम बंद आंदोलनामुळे बुधवारी फलटण आगारातील एस. टी. बस फेर्या रद्द झाल्या. आगारात व स्टॅण्डवर एस. टी. बसची रांग लागली होती. काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थी, विद्यार्थीनी, कामगार, शेतकरी, महिला व प्रवाशांचा खोळंबा झाला.