समुद्रपूर: शहर पोलिसांची अवैध दारू विक्री विरोधात ३ ठिकाणी कारवाई, साडेचार हजार रुपयांची दारु जप्त
समुद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात वायगाव हळद्या,समुद्रपूर ते लाहोरी रोडवर, शहरातील आंबेडकर चौक या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत आंबेडकर चौकात २२५० रुपये किमतीची देशी व गावठी मोहा दारू जप्त केली तर वायगाव हळद्या येथे १२०० रुपये किमतीची देशी दारू व समुद्रपूर ते लाहोरी रोडवर १०८० रुपये किमतीची देशी दारू असा एकूण ४ हजार ५३० रुपये किमतीची देशी व मोहा दारूसाठा जप्त केला.