सन 2025-26 मध्ये झालेल्या अतीवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या व बुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना विहिरींची दुरुस्ती करणे अशक्य झाल्याने सिंचन व्यवस्था ठप्प पडली आहे. शासनाने विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्याचा निर्णय घेतला असतानाही पंचायत समिती स्तरावर अर्जांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत खासदार अमर काळे यांनी जिल्हाधिकारी अमरावती व वर्धा यांच्याकडे पत्राद्वारे तात्काळ पंचनामे करून अर्थसहाय्य व