नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी आणि उत्साहाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कामठी शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष कृती आराखडा तयार केला असून महत्त्वाच्या चौकांमध्ये 'फिक्स पॉईंट' लावण्यात आले आहेत.कामठीतील ड्रॅगन पॅलेस परिसर, रॅली चौक, आणि मुख्य बाजारपेठ परिसरात पोलिसांची विशेष गस्त असणार आहे.