वरोरा तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी सुरेंद्र देठे यांनी स्वतःच्या शेतातील खराब झालेले सोयाबीन पीक ट्रॅक्टर चालवून नष्ट केले, ही घटना आज दि 21 ऑक्टोबर 12 वाजता ऐन दिवाळीच्या समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतातून मिळणारे उत्पादन खर्चभरही येणार नसल्याने, अखेर भुसारी यांनी नाईलाजास्तव आपले पीक रोटावेटर फिरवून नष्ट करण्याचा निर्णय घेतला.