वरोरा: जामगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आमदार करण देवतळे यांची भेट
वरोरा तालुक्यातील जामगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. केशव आसुटकर यांच्या कुटुंबाची आज दि. 17 ऑक्टोबरला 3 वाजता आमदार करण देवतळे यांनी भेट घेऊन त्यांच्या दुःखात वैयक्तिकरित्या सहभागी असल्याचे त्यांनी सांगितलेया दुर्दैवी घटनेने मन विषण्ण झाले - कष्टकरी शेतकऱ्याच्या आयुष्यातील ही शोकांतिका समाजाला विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे कुटुंबाला आधार मिळावा म्हणून वैयक्तिक पातळीवर आमदार करण देवतळे यांनी मदत प्रदान केली.