मोहाडी: इंदिरा वॉर्ड येथे 'ट्रॅक्टर-रेती' वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी! एकाच घटनेत दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल
मोहाडी येथील इंदिरा वॉर्ड परिसरात दिनांक १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वा. दरम्यान जुन्या वैयक्तिक वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या एकाच घटनेप्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नैतराम साठवने (वय ४०) या फिर्यादीनुसार, त्यांनी ट्रॅक्टरचे सामान रस्त्यावर ठेवण्याबाबत नगरपंचायतीकडे तक्रार केली होती. याच रागातून आरोपी शैलेश गभने याने दोन मुलांसह