तेल्हारा: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारतावर गंभीर संकट असल्याचा इशारा दिला.
Telhara, Akola | Oct 30, 2025 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारतावर गंभीर संकट असल्याचा इशारा दिला आहे. अकोल्यातील बार्शीटाकळी येथे कार्यकर्ता संवादानंतर ते बोलत होते. त्यांनी मीडियाला जबाबदारीने वागण्याचं आवाहन करत म्हटलं की, “निवडणुका बाजूला ठेवा, सध्या भारतावर मोठं संकट आलं आहे.” आंबेडकर म्हणाले की, येत्या तीन महिन्यांत भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, “आर्मी प्रमुखांनीही संकेत दिले आहेत.” त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना म्हटलं आहे.