महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. पण अद्याप महायुतीचे जागावाटप झालेले नाहीये, शेवटपर्यंत जागावाटप चालणार आहे. म्हणून इच्छुकांनी गडबड करू नका, अनेक घडामोडी घडणार आहेत. प्रभागासाठी पॅनलही होणार असून पक्षाकडून योग्य उमेदवार दिले जाणार आहेत. लिंबाशेठ नागरगोजे व बाळासाहेब नागरगोजे यांच्यासारखे प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला बळकटी आली आहे हे बळकटी शहराच्या विकासासाठी उपयोगी पडणार आहे