राधानगरी: मुरगूडमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ, मुरगूड पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर घरफोड्या
मुरगूड शहरात घरफोडीच्या घटना पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे.यामध्ये काही ठिकाणी घरफोडी तर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे.सर्वप्रथम महालक्ष्मी नगर येथील बंद घरी चोरी झाल्यानंतर, आता मगदूम कॉलनीमधील दोन घरे चोरट्यांनी फोडली आहेत. याशिवाय, तुकाराम चौकातील चौगुले गल्ली आणि भोसले कॉलनी येथे चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, चौगुले गल्ली येथून एक दुचाकी चोरण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला,