वर्धा: जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 13 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत विकास भवन येथे आयोजन:जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम
Wardha, Wardha | Nov 10, 2025 युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी क्रीडा व कृषि विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.