राजूरा: मौजा टेंभुरवाही येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना हायवा पकडला
मौजा टेंभुरवाही येथे आज दि 12 ऑक्टोबरला अवैध गौण खनिज (रेती) वाहतूक करत असलेला MH34 BG 8419 क्रमांकाचा हायवा पकडण्यात आला आहे. ही कारवाई सकाळी सुमारे 6 वाजता करण्यात आली असून, संबंधित वाहनास सकाळी 6.30 वाजता तहसील कार्यालय राजुरा येथे लावण्यात आले. सदर हायवा सचिन युकीनकर, गडचांदुर यांच्या नावावर असून, वाहन चालवणारा जनार्दन राठोड असा चालकाचा नाव आहे. या हायव्यात अंदाजे 6 ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक केली जात होती.