सेनगाव: मुख्यालयी न राहता घर भाडे उचलणाऱ्या शिक्षकावर कारवाई करा,अन्यथा आंदोलन प्रहार चे जिल्हा प्रमुख विजय वानखेडे
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय वानखेडे यांनी मुख्यालयी न राहता घर भाडे उचलणाऱ्या शिक्षकांवर चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता केली आहे. काही शिक्षक हे शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून मुख्यालयी न राहता घर भाडे उचलतात त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाई करून व मुख्यालयी राहणारे शिक्षकांना पदोन्नती देण्याची मागणी विजय वानखेडे यांनी केली असून दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.