सातारा: साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटका महोत्सव सुरू — नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
Satara, Satara | Oct 16, 2025 सातारा शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर दिवाळीनिमित्त फटाका असोशियनतर्फे भव्य फटका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत फटाक्यांचे स्टॉल लावण्यास प्रशासनाकडून परवानगी नसल्यामुळे, शासनाच्या नियमांचे पालन करत मागील 21 वर्षांपासून हा महोत्सव जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरविला जात आहे.या महोत्सवात विविध नामांकित फटाका उत्पादक कंपन्यांचे स्टॉल उभारण्यात आले असून सर्व स्टॉल शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारले गेले आहेत.