सात जानेवारीला पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील आलम नगर येथे राहणारे आदिल हसन हे त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दाराला कुलूप लावून छत्रपती चौक येथे ऑफिसमध्ये गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले घड्याळ, सोन्याची कोटिंग असलेला चष्मा, सोन्याचे दागिने चांदीचा सिक्का व इतर साहित्य असा एकूण चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.