वाशिम: दिवाळीच्या पूर्वसंध्येला भटक्या फासेपारधी जमातीच्या घरावर चालला प्रशासनाचा बुलडोझर , गरिबांची दिवाळी अंधारात
Washim, Washim | Oct 17, 2025 संपूर्ण देशासह वाशिम जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीच्या सणाची तयारी जोरदार सुरू असतानाच ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला वसुबारसेच्या दिवशीच वाशिम तालुक्यातील काजळंबा येथे गेले काहीं वर्षांपासून इ क्लास जमिनीवर कच्चे घरे बांधून राहणाऱ्या फासेपारची जमातीच्या घरावर दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता वाशिम जिल्हा प्रशासनाच्या बुलडोझर चालला.