पाचोरा: खडकदेवळा येथील शेतकरी राघो विठ्ठल मोरे यांच्या शेत शिवारातील शेतात वीज कोसळल्याने म्हैस जागीच ठार,
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी राघो विठ्ठल मोरे यांच्या शेत शिवारातील शेतात आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास असलेल्या पावसात वीज कोसळल्याने म्हशीचा दुर्दैवी अंत झाला, अचानक वीज कोसळल्याने त्यांच्या शेतातील त्यांची म्हैस जागीच ठार झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, पंचनामा होऊन आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे,