जालना: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; आरोपीला सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा
Jalna, Jalna | May 9, 2026 अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय-03, जालना यांनी आरोपीस सहा महिने सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवार दि. 9 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हा निकाल मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. व्ही. मोरे यांनी दिला. या प्रकरणातील आरोपी शेख अशपाक शेख सलिम रा. टेंभुर्णी, ता. जाफ्राबाद, जि. जालना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.